'चला हवा येऊ द्या' हा शो जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. शोमधील कलाकार प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात.
'चला हवा येऊ'च्या माध्यमातून अनेक कलाकार देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाले आहेत. यातीलच प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे.
दरम्यान या शोमधील एक कलाकार शो सोडणार की काय? अशी चर्चा रंगली आहे.
हा अभिनेता इतर कुणी नसून अंकुश वाढवे आहे. यामागचं कारणसुद्धा तसंच आहे.
अंकुश लवकरच 'व्यक्ती प्रवृत्ती' या नाटकात झळकणार आहे. अभिनेत्याने स्वतः याची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे या नाटकाच्या माध्यमातून अंकुश दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.सहकलाकार असणाऱ्या कुशल बद्रिकेने त्याला सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
त्यामुळे अंकुश वाढवे चला हवा येऊ द्यामध्ये दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.