कान्स महोत्सव नेहमीच भारतीयांसाठी खास असतो. कारण याठिकाणी अनेक बॉलिवूड कलाकार पाहुणे म्हणून सहभागी होत असतात.
यंदाचा कान्स सोहळासुद्धा तितकाच औत्सुक्याचा ठरला. यामध्ये अनेक तारकांनी आपल्या स्टाईलने लोकांना घायाळ केलं आहे.
मात्र कान्स महोत्सव 2023 सुरु झाल्यापासून चाहत्यांना अनुष्का शर्मा रेड कार्पेटवर कधी दिसणार याची उत्सुकता लागून होती.
दरम्यान आता अनुष्का शर्माने आपला रेड कार्पेट लूक शेअर करत चाहत्यांना मेजवानी दिली आहे.
अनुष्का शर्माने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कान्स 2023 मधील आपला जबरदस्त लूक शेअर केला आहे.
चाहत्यांसोबतच सेलिब्रेटींनासुद्धा अनुष्काचा हा क्लासी अंदाज पसंत पडत आहे.
नेटकऱ्यांनी तर अनुष्काच्या कान्स लूकने इतर अभिनेत्रींवर मात केल्याचं म्हटलं आहे.