NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'RRR' मध्ये फक्त 10 मिनिटांसाठी दिसणार आलिया भट्ट! मिळाले तब्बल इतके कोटी

'RRR' मध्ये फक्त 10 मिनिटांसाठी दिसणार आलिया भट्ट! मिळाले तब्बल इतके कोटी

आलियाने फारच कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. सध्या ती आपल्या 'RRR' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

18

आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत कोणत्या न कोणत्या प्रोजेक्टसमध्ये व्यग्र असते. सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. आलियाने फारच कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. सध्या ती आपल्या 'RRR' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती प्रथमच साऊथ चित्रपटात झळकणार आहे.

28

आलिया भट्ट साऊथ सुपरस्टार ज्यु.एनटीआर आणि रामचरण यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटात अजय देवगनसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.

38

गेली अनेक दिवस हे कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. परंतु कोरोना परिस्थिती पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

48

दरम्यान आलिया भट्टच्या माधनाची जोरदार चर्चा होत आहे. आलिया भट्ट या चित्रपटात फक्त 10 मिनिटांसाठी आहे.

58

या 10 मिनिटाच्या भूमिकेसाठी आलियाने सहा कोटी घेतल्याची चर्चा होती.

68

त्यांनतर आता आलिया भट्टने या भूमिकेसाठी 9 कोटी घेतल्याचं म्हटलं जात आहे.

78

या चित्रपटात आलिया रामचरणची पत्नी सीता अल्लुरीच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

88

तसेच आलिया भट्ट आगामी काळात 'गंगुबाई काठियावाडी', ब्रह्मास्त्र आणि रॉकी और रानी कि प्रेम कहाणीमध्ये झळकणार आहे.

  • FIRST PUBLISHED :