बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीने पडद्यावर धुमशान माजवलं होतं. या दोघांचे चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हिट व्हायचे. इतकंच नव्हे तर चाहतेही या दोघांच्या चित्रपटांची वाट पाहत होते, मग असं काय झालं की, ही जोडी वेगळी झाली?आज आपण याबाबतच जाणून घेऊया.
मुकाबला (1993), प्रेम शक्ती (1994), राजा बाबू (1994), दुलारा (1994), खुददार (1994), अंदाज अपना अपना (1994), कुली नंबर 1 (1995), साजन चले ससुराल (1996), हिरो नंबर 1 (1997), हसीना मान जायेगी (1999) आणि शिकारी ( 2000) गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी त्याकाळात हे 11 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. जे बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरले होते. या दोघांची जोडीही पडद्यावर गाजली होती.
1993 ते 1999 या काळात करिश्मा आणि गोविंदा या जोडीने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. या दोघांच्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहात असत आणि त्यामुळेच या दोघांचे चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हिट व्हायचे.
पण, 2000 च्या आसपास पडद्यावरील ही लोकप्रिय जोडी तुटली. याकाळात करिश्माने गोविंदापासून दूर राहण्याचं ठरवलं होतं. गोविंदासोबत तिचा काही वाद किंवा भांडण झालं असं मूळीच नव्हतं. पण गोविंदापासून दूर राहण्यामागचं तिचं कारण आश्चर्यकारक होतं.
एकदा करिश्माने स्वतः मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, गोविंदासोबत तिचे चित्रपट नक्कीच यशस्वी झाले होते, पण ती मसाला चित्रपटांना कंटाळली होती. आणि त्या वेळी माधुरी दीक्षित, जुही चावला आणि इतर अभिनेत्रींना मिळत असलेली ओळख तिला मिळत नव्हती.
यामुळे करिश्मा गोविंदापासून दुर झाली. आणि त्याच्यासोबत मसाला चित्रपट करण्यास नकार दिला. गोविंदापासून दूर राहिल्यानंतर तिला त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत चित्रपट करणं अधिक योग्य वाटलं आणि तिची ही विचारसरणीही कामी आली. जेव्हा तिने दोन्ही खानसह चित्रपट करण्यास सुरुवात केली, तेव्हा करिश्माच्या कारकिर्दीला एक नवीन उंची मिळाली आणि ती लवकरच ए-लिस्ट अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली होती.