एखाद्या चित्रपटाच्या प्रत्येक सीनसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तसेच एकेका सीनसाठी अफाट पैसा खर्च करावा लागतो. बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत असे काही सिनेमे आहेत, ज्यांच्या केवळ एका सीनसाठी इतका खर्च आला होता की, या बजेटमध्ये केजीएफसारखे दहा सिनेमे तयार होतील. पाहूया या लिस्टमध्ये कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे.
साऊथ स्टार धनुषच्या 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटाच्या एका सीनसाठी तब्बल 319 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
'बाहुबली' स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो' या चित्रपटाच्या एका सीनसाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका सीनसाठी 15 कोटींचा खर्च आला आहे.
सलमान खानच्या 'राधे' या सिनेमातील एका सीनसाठी जवळपास 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
अक्षय कुमारच्या 2.0 या चित्रपटातील एका सीनसाठी जवळपास 20 कोटी खर्च झाले आहेत.
साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या 'नरसिम्हा' या चित्रपटातील एका सीनसाठी तब्बल 54 कोटी रुपये खर्च आला होता.
ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' सिनेमाच्या एका सीनसाठी तब्बल 46 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
बहुचर्चित प्रभासच्या 'आदिपुरुष'मधील एका सीनसाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्च आलंय.