Rekha Shockingly Had Expressed His Feelings: बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी 180 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. असं जरी असलं तरी त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत. 68 वर्षाच्या रेखा यांचा चाहता वर्ग मोठा आहे. रेखा यांच्या सिनेमापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या लव्ह लाईफची झाली. आजही रेखा या त्यांच्या लव्ह लाईफवर बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. जे मनात येईल ते अगजी बेधडक बोलताना दिसतात.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आजही रेखा यांचे नाव टिकून आहे. आजही रेखा तितक्याच सुंदर दिसतात जितक्या त्या 30 वर्षापूर्वी दिसत होत्या. रेखा यांनी 'इंती गुट्टू (1958)' आणि 'रंगुला रत्नम (1966)' या तेलुगू सिनेमात बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पहिलं पाऊल ठेवलं. रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला पहिला सिनेमा कन्नड होता. या सिनेमाचं नाव 'ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सी.आई.डी. 999' थी, असं होतं. हा सिनेमा 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्या 1970 साली 'सावन भादों' या सिनेमात दिसल्या.
रेखा यांना खरी ओळक 1978 साली आलेल्या घर आणि मुकद्दर का सिकंदर या सिनेमांमुळे मिळाली. 1980 ते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला रेखा यांनी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवले.
रेखा यांच्या सिनेमांपेक्षा त्यांच्या लव्ह लाईफची जास्त चर्चा व्हायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि अभिनेते अमिताभ बच्चन एकमेकांच्या सिनेमात अखंड बुडाले होते.
मात्र या दोघांच्या प्रेमाची गाडी ट्रॅकवर येण्यापूर्वीच अमिताभ यांचे लग्न झालं. रेखा यांना त्यांच्या लव्ह लाईफबद्दल जेव्हा जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी बेधडक उत्तर दिलं आहे.
सिमी ग्रेवालच्या शोमध्ये देखील रेखा यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाविषयी विचारण्यात आलं होत. त्यावेळी देखील रेखा यांनी मोकळ्या मनांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्ही पण त्यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होता?
सिमीच्या प्रश्नाला उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या की, होय..मी त्यांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होते. माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहेत.
तसेच सिमी पुढे विचारते की, तुम्ही त्यांना कधी भेटला आहात का? यावर रेखा म्हणते की, मी त्यांना खूपदा पुरस्कार सोहळ्यात तसेच विविध कार्यक्रमात पाहिलं आहे.
सिमी पुढे विचारते की, तुम्ही फक्त त्यांना पुरस्कार सोहळ्यात पाहिलं आहे का? यावर रेखा लगेच उत्तर देतात आणि म्हणतात की, माझ्यासाठी तेवढं खूप आहे
यावर सिमी म्हणते की, तुम्ही एवढ्यावरच समाधानी आहात का ? रेखा म्हणतात की, हो मी आनंदी आणि समाधानी आहे. ही मुलाखत खूप जूनी आहे.