बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत ओळखली जाते. ती सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
एका मुलाखती दरम्यान मल्लिकानं म्हटलं आहे, की मी प्रत्येक चित्रपटामध्ये काम करण्यासाठी ऑडिशन दिल्या आहेत.
मला कधीच कोणताच चित्रपट ऑडिशन न देता मिळालेला नाही. 'द मिथ' मध्ये काम करताना सुद्धा अनेक अभिनेत्रीचं ऑडिशन घेण्यात आलं होतं.
तसंच मल्लिकानं म्हटलं आहे, की ही प्रक्रिया स्टार किड्सनां सुद्धा लागू व्हायला हवी.
मल्लिका पुढे म्हणते, मला चित्रपटासाठी बोलवल्यानंतर माझी स्क्रिन टेस्ट झाली.
चित्रपटासाठी मला सांगण्यात आलं होतं, की मी या रोलसाठी योग्य असेल तरच घेण्यात येईल.
मल्लिकाने मर्डर सारख्या चित्रपटातून एक बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे.