बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) दीर्घकाळापासून सिनेमातून गायब आहे. पण एक काळ असा होता की, जेव्हा मल्लिका शेरावतचं नाव खूप चर्चेत होतं. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mallikasherawat)
मल्लिका तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. मल्लिकाने 28 वर्षीय कलाकाराबरोबर ते 65 वर्षीय कलाकाराबरोर इंटिमेट सीन केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mallikasherawat)
24 अक्तूबर 1976 रोजी मल्लिकाचा जन्म झाला. आज मल्लिका 44वा वाढदिवस साजरा करत आहे. हिसार नावाच्या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या या अभिनेत्रीने आधी बॉलिवूड आणि त्यानंतर हॉलिवूड असा प्रवास केला.
मल्लिकाने तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. कालांतराने कुटुंबीयांनी याचा स्विकार केला. मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा आहे. तिने बॉलिवूडसाठी तिचं नाव मल्लिका केलं आहे.
मल्लिका अशी पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने जॅकी चैनबरोबरही काम केले आहे. हिंदीबरोबरच तिने इंग्रजी आणि चिनी सिनेमातही काम केले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mallikasherawat)
अभिनयाआधी एअरहॉस्टेस म्हणून काम करणाऱ्या मल्लिका शेरावतला 'मर्डर' सिनेमाने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. इमरान हाश्मी या सिनेमात प्रमुख भूमिकेत होता. 'प्यार के साइड इफेक्ट्स, 'आपका सुरूर' आणि 'डबल धमाल' या कॉमेडी सिनेमात देखील तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mallikasherawat)
मल्लिकाने 'हिस्स्स' आणि 'पॉलिटिक्स ऑफ लव' या इंग्रजी सिनेमात काम केले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mallikasherawat
शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती एअर हॉस्टेस म्हणून काम करत होती. त्यावेळी पायलट करण गिल आणि तिच्यामध्ये मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि त्यानंतर लग्नात झालं. पण एका वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला होता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mallikasherawat)