केजीएफ (KGF – Chapter 2 (Hindi) ने 7 दिवसात वर्ल्डवाइड 716 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 255- 265 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर अली अब्बास जफरचा सिनेमा सुल्तान (Sultan) ने 7 दिवसात 208.82 कोटी रुपयांची कमाई केली होती.
सिद्धार्थ आनंदचा सिनेमा ज्यामध्ये ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफची भूमिका आहे, त्या War ने आठवडा पूर्ण होईपर्यंत 208.05 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.
सलमान खान आणि कॅटरीना कैफ स्टारर अली अब्बास जफरच्या Tiger Zinda Hai ने सात दिवसात 206.04 कोटींची कमाई केली होती.
राज कुमार हिरानी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर Sanju सात दिवसात 202.51 कोटींची कमाई केली होती.
एस एस राजामौली दिग्दर्शित प्रभास स्टारर फिल्म बाहुबली 2 (Baahubali – The Conclusion) च्या हिंदी (Hindi) व्हर्जनने 7 दिवसात 247 कोटींची कमाई केली होती.
सलमान खान च्या बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) या सिनेमाने सात दिवसात 184.62 कोटींचा व्यवसाय केला होता.
आमिर खान, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा स्टारर दंगल सिनेमाने (Dangal) 193.53 कोटी रुपये आठवडाभरात कमावले होते..
अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि आमिर खानचा पीके हा सिनेमा देखील सुपरहिट ठरला होता. PK ने एका आठवड्यात 183 कोटी रुपये कमावले होते..
Dhoom: 3 ने एका आठवड्यात 178.89 कोटी रुपये कमावले होते.