NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'एज इज जस्ट अ नंबर!' वाढत्या वयातही सर्वाधिक कमाई करतात हे बॉलिवूड स्टार

'एज इज जस्ट अ नंबर!' वाढत्या वयातही सर्वाधिक कमाई करतात हे बॉलिवूड स्टार

बॉलिवूडमधील नव्या अभिनेत्यांना चॅलेंज देण्यासाठी जुने अभिनेते आजही कामात तितकेच तत्पर आहेत. जाणून घ्या या हिरोंची किती आहे कमाई

17

'Age is just a number' या ओळीला अगदी व्यवस्थित रित्या जगणारे या हिरोंची यादी आहे. या अभिनेत्यांची पन्नासी उलटली आहे. तरीही बॉलिवूडमध्ये जोमानं काम करणारे हे हिरो आजही नव्या हिरोंना टक्कर देत आहेत. प्रत्येक क्षेत्रामधील माणसाला वयानुसार विश्रांती हवी असते. पण हिंदी सिनेसृष्टीतील या कलाकारांना आजही काम करायचं आहे.

27

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार पहिल्या क्रमांकावर आहे. 51 वर्षाच्या अक्षयकुमारनं सुरुवातीच्या काळात अॅक्शनने तरुणांना वेड लावलं आणि आता सामाजिक विषयावर आधारीत सिनेमे करून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. सर्वात जास्त कमवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अक्षयकुमार आहे. फोर्ब्सनं दिलेल्या यादीनुसार अक्षयकुमारची 40.5 मिलियन डॉलर इतकी कमाई आहे. जास्त कमवणाऱ्या अभिनेत्यांपैकी अक्षय सातव्या क्रमांकावर आहेत.

37

52 वर्षाचा सलमान खान बॉक्स ऑफिसचा 'टाईगर' म्हणून ओळखला जातो. सलमान खानचे चित्रपट येताच हिट होणं हे समीकरण बनलं आहे. अभिनेता सलमान खान प्रसिद्धी आणि कमाईत खूप पुढे आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार भाईजान 38.5 मिलियन डॉलरच्या कमाई तो करतो.

47

बॉलिवूडचा बाहशाह शाहरुख खानसोबत जुन्यापासून ते नव्या अभिनेत्रींपर्यंत सर्वांनी काम केलं आहे. सिनेमा असो किंवा त्याची रियल लाईफ लोकांना आजही त्यात रस वाटतो. 53 वर्षांच्या शाहरूखवर लोकांचं प्रेम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतं. अभिनेता शाहरुखची वर्षाला 38 मिलियन डॉलर इतकी कमाई आहे.

57

शाहरूखप्रमाणेच 53 वयाचा अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एका चित्रपटाचे 60 करोड रुपये कमवतो. त्याचबरोबर चित्रपटाच्या नफ्यातही आमिरची भागीदारी असते.

67

वयानं स्वत:ला कधीही जास्त न समजणारा 61 वर्षांच्या अनिल कपूरची एनर्जी त्याच्या अभिनयातून दिसून येते. झक्कास अनिल कपूरची वार्षिक कमाई 12 मिलियन डॉलर इतकं आहे .

77

बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन 76 वर्षांचं आहेत. अमिताभ बच्चन यांची वर्षांची कमाई 33.5 मिलियन डॉलर आहे.

  • FIRST PUBLISHED :