Bollywood Family: बॉलिवूड जगतात असा एक परिवार आहे, त्या घरात कुटुंब प्रमुख सुपरस्टार आहे तर मुलाचं फिल्मी करिअर मात्र म्हणावं तसं चाललं नाही. मात्र लेकीनं टीव्ही जगतात असा काही चमत्कार केला की तिला आज मालिका विश्वाची मालकीण म्हणूनच ओळखलं जातं. आम्ही बोलत आहे 60 ते 70 दशक गाजवणाऱ्या सुपरस्टार जितेंद्र यांच्याविषयी..
जितेंद्र आता 80 वर्षाचे झाले आहेत. 60 ते 80 दशकांपर्यंत त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालक होते. एक सुपरस्टार म्हणून त्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला.
1974 मध्ये त्यांनी शोभा कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुलं आहेत. मुलगा तुषार कपूर आणि मुलगी एकता कपूर हिला सर्वजण ओळखतात.
तुषारने 2001 मध्ये 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तो करीना कपूरसोबत दिसला होता.
त्याच्या पहिल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, पण नंतर त्याचे काही चित्रपट म्हणावे असं यश मिळू शकले नाहीत.तसं पाहता वडिलांच्या तुलनेत तुषारला यश मिळालं नाही.
हळूहळू तुषारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडू लागले. त्याचे करिअर म्हणावं तसं गती घेऊ शकलं नाही. त्यानंतर त्याने बॉलिवूडपासून लांब राहणं पसंत केलं. त्याचे खाकी, गोलमाल फ्रँचायझी आणि द डर्टी पिक्टर सारख्या काही चित्रपट लोकांच्या आजही स्मरणात आहेत.
जितेंद्र यांचा मुलगा म्हणावं तेवढं यश मिळवू शकला नाही मात्र त्यांची मुलगी एकता कपूर टीव्ही जगताची राणी आहे. टीव्ही जगतता एकतानं निर्माती म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'कहानी घर घर की' या मालिकांनी तिला मालिका विश्वातील राणी बनवलं. एकत कपूर आणि मालिका हे समीकरणचं बनलं आहे.
तिची प्रत्येक मालिका ही काहींना काही नवीन घेऊन येत असते. म्हणून तर ती एक यशस्वी निर्माती आहे.
तिनं स्वत:ची ओळख तर निर्माण केलीच, पण या मालिकांनी अनेक कलाकारांच्या आयुष्याला आकार दिला आहे.