बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आलिया कश्यपने नुकताच सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेंडच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
आलियाने खुलासा करत म्हटलं आहे, की त्याची बॉयफ्रेंडसोबत पहिली भेट एका डेटिंग वर झाली होती.
आलिया कश्यप सध्या विदेशी बॉयफ्रेंड शेन ग्रेगवॉ सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
ती सतत शेनसोबत सोशल मीडियावर फोटो शेयर करत असते.
आलिया सांगते की सोशल मीडियावर आम्ही भेटल्या नंतर 2 महिने एकमेकांशी बोलत होतो.
2 महिन्यानंतर आम्ही एकमेकांना प्रत्यक्षात भेटलो.
आलियाने म्हटलं आहे, की पाहिलं किस शेनने नाही तर मी केलं होतं.
तसेच आलिया म्हणते की, आम्ही बोलत होतो, मात्र शेन मला किस करण्यासाठी काही हालचालच करत नव्हता.
त्यामुळे मला वाटलं होतं, की तो विचार करत असेल की मी यासाठी कॉम्फरटेबल आहे की नाही.
त्यामुळे शेनला किस करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता.
आणि तो प्रसंग खुपचं विचित्र होता. असंही आलिया म्हणते.
विचित्र यासाठी की आम्ही काहीतरी बोलत होतो. आणि मी मध्येच शेनला किस केलं.
कारण माझ्या डोक्यात हे विचार घोळत होते, आणि त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते.
म्हणून मी पटकन शेनला किस करून टाकलं. आलियाने हा सगळा किस्सा आपल्या युटयूब चेनेलवर सांगितला आहे.