रंगपंचमी हा एक असा सण आहे. ज्यात सर्व लोक आपआपसातील वादविवाद विसरून रंगात न्हावून जातात. मात्र यावेळी कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमी साजरी न करता आपल्या घरीचं साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणूनचं आपण आज उजाळा देणार आहोत बॉलीवूड कलाकारांच्या रंगपंचमीच्या आठवणींना.
प्रियांका चोप्रा गेल्या वर्षी खास रंगपंचमीसाठी परदेशातून आपला पती निक जोनस सोबत भारतात आली होती. आपल्या विदेशी पतीसोबत तिनं मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा आनंद घेतला होता.
एकता कपूर सुद्धा दरवर्षी खूपच मोठ्याने रंगपंचमी साजरी करते. यात टीव्ही पासून ते बॉलीवूड पर्यंत मोठमोठे कलाकार उपस्थित असतात.
गेल्यावर्षी अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबांसोबत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली होती. अभिषेक यावेळी आपला एक कुटुंबासोबत फोटो सुद्धा पोस्ट केला होता. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
करीनाकपूरने सुद्धा गेल्यावर्षी आपल्या रंगपंचमीचे फोटो मीडियावर शेअर केले होते. तसेच करिश्माने सुद्धा आपल्या मुलांसोबत रंगपंचमीचा आनंद घेतला होता.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या घरी सुद्धा रंगपंचमी निमित्त मोठा कार्यक्रम ठेवला जातो. या फोटो मध्ये शबाना आझमी डोक्यावर फेटा बांधून होळीचा आनंद घेताना दिसत आहेत.
यावर्षी प्रमाणे गेल्यावर्षी सुद्धा नेहाने आपल्या गोंडस मुलीसोबत रंगपंचमी साजरी केली होती.
अभिनेत्री सोहा अली खान हिनं आपला पती अभिनेता कुणाल खेमू आणि मुलीसोबत रंगपंचमी साजरी करत, एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
गेल्यावर्षी अभिनेत्री भूमी पेडणेकरने सुद्धा मोठ्या जल्लोषाने रंगपंचमी साजरी केली होती. तिचे बरेच फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.