NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 6 पॅक अ‍ॅब्स कमावले अर्जुनने पण कौतुक मात्र मलायकाचं! अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते थक्क

6 पॅक अ‍ॅब्स कमावले अर्जुनने पण कौतुक मात्र मलायकाचं! अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते थक्क

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या दीड वर्षांपासून त्याच्या फिटनेस संदर्भात अधिकच गंभीर आहे. त्याने गेल्या 15 महिन्यात अधिक तंदुरुस्त शरीर कमावले आहे, त्याची फिट बॉडी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अभिनेत्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुनने त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एकावर फेब्रुवारी 2021 तर एकावर मे 2022 असे लिहिले आहे. यामध्ये तो शर्टलेस लुकमध्ये असून फेब्रुवारी 2021 ते मे 2022 या काळात त्याच्यामध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येते आहे.

18

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor Fitness Journey) गेल्या 15 महिन्यांपासून फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. अर्जुनने त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एकावर फेब्रुवारी 2021 तर एकावर मे 2022 असे लिहिले आहे (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

28

अर्जुन कपूर त्याच्या या दोन फोटोंची तुलना करत सिक्स पॅक अ‍ॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे. यामध्ये एक लांबलचक कॅप्शन लिहित अर्जुनने त्याचा 15 महिन्यांचा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास सांगितला आहे. (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

38

अर्जुन कपूर याने कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, '#workinprogress चे 15 महिने! क्यूट वाटले आणि नक्कीच हा फोटो डिलीट करणार नाही कारण मला माझ्या या प्रवासाचा अभिमान आहे. फेब्रुवारी 2021 ते मे 2022. हे कठीण होतं, पण मला आनंद आहे की मी ट्रॅकवर राहू शकलो.' (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

48

अर्जुन कपूरने असे म्हटले आहे की, 'यावर विश्वास ठेवणे कठीण आहे की हा प्रवास खूप कठीण होता. आताही आहे, पण मी त्या मानसिक स्थितीवर प्रेम करू लागलो आहे ज्यामध्ये मी गेले 15 महिने आहे. मला आशा आहे की हे असेच राहील. मला अस वाटायला लागण्यास खूप वेळ गेला आहे. हा मी आहे हा मी आहे! (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

58

अर्जुन कपूरच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. त्याच्या फिटनेस जर्नीचे विशेष कौतुक होत आहे. काही चाहते त्याच्या फिटनेसचे क्रेडिट मलायकाला देत आहेत. (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

68

काही युजर्सनी असे म्हटले आहे की, 'जेव्हापासून मलायका अर्जुनच्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून अभिनेत्याचा कायापालट झाला आहे. प्रेमाने अर्जुनला बदलले आहे'. काहीच तासात अर्जुनच्या फोटोवर लाखो लाइक्स आले आहेत. (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

78

अर्जुन कपूर आणि मलायका बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल आहेत. जवळपास 5 वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी देखील ते एकत्र दिसतात. सोशल मीडियावर देखील एकमेकांसह फोटो पोस्ट करतात. या कपलच्या लग्नाचीही प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

88

फिटनेसबाबत बोलायचं झालं तर मलायका अशा अभिनेत्रींपैकी आहे ज्यांच्या आयुष्यात फिटनेसला विशेष महत्त्व आहे. 48 वर्षीय अभिनेत्रीचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं तसं कठीणच जातं. ती नेहमी तिचे लुक्स, फिटनेस, विविध फोटोशूट यामुळे चर्चेत असते. (फोटो क्रेडिट : Instagram @arjunkapoor)

  • FIRST PUBLISHED :