आतापर्यंत लग्न होताना मुलांचं वय मुलीपेक्षा जास्त असतं. अशी फार कमी लग्न आहेत, ज्यात मुलींचं वय मुलांपेक्षा जास्त असतं. बॉलिवूडमध्ये मुलांपेक्षा मुलींचं वय जास्त असणारी अनेक उदाहरणं आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा येत्या 2 डिसेंबरला तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. प्रियांकानं स्वतःहून 10 वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनसशी लगीनगाठ बांधली. हे दोघं 2017मध्ये पहिल्यांदा मेट गाला इव्हेंटमध्ये भेटले होते.
अभिनेत्री ऐश्वर्या रायनं नुकताच तिच्या 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. अभिषेक ऐश्वर्यापेक्षा 1 वर्षानं लहान आहे. आता या दोघांना आराध्या ही 8 वर्षांची मुलगी आहे.
बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे उर्मिला. उर्मिला सिनेसृष्टीत सक्रीय नसली तरी आजही उर्मिलाच्या नावाला बॉलिवूडमध्ये वजन आहे. उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी आपल्यापेक्षा १० वर्ष लहान काश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तरशी लग्न केलं.
सैफली खानची छोटी बहीण सोहा अली खानने तिच्याहून पाच वर्ष लहान असलेल्या प्रियकराशी कुणाल खेमुशी लग्न केलं. दोघांचंही बॉलिवूडमध्ये चांगलं नाव आहे.
बॉलिवूडकरांना अर्चना पुरण सिंग हे नाव नवीन नाही. अर्चनाला अनेक विनोदीपटांसाठी ओळखलं जातं. अर्चनाने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अर्चनाने तिच्याहून सात वर्ष लहान परमीत सिंगशी लग्न केलं. आज दोघांना दोन मुलं आहेत.
शिल्पानेही तिच्याहून ३ महिने लहान असलेल्या राज कुंद्राशी लग्न केलं. या दोघांच्या वयात फारसा फरक नसला तरी राजचं हे दुसरं लग्न आहे. त्याने शिल्पासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.