Urvashi Rautela Viral Photos: उर्वशी रौतेलाने तिच्या मेहनतीने यशाच्या पायऱ्या चढत बॉलिवूड तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. उर्वशी रौतेलाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर 46 मिलियनचा टप्पा पार केला आहे. उर्वशी ही इंस्टाग्रामची रिअल क्वीन आहे. ती नेहमीच तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सला तिच्या दैनंदिन रुटीनबद्दल अपडेट देत असते. (फोटो क्रेडिट्स: Instagram @urvashirautela)
अॅन्युअल हेलो अवॉर्ड्स 2022 चे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. याठिकाणी अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. मात्र याठिकाणी उर्वशीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले (फोटो सौजन्य: Instagram @urvashirautela)
अवॉर्ड शोमध्ये, तिने डीएल मायाच्या बेस्ट डिझाइनसह एक डीप कट हाय स्लिट बॉडी फिटिंग लाँग गाऊन परिधान केला होता, जो चमकणाऱ्या सोनेरी फुलांच्या पॅटर्नने चमकत होता. (फोटो सौजन्य- Instagram @urvashirautela)
हा चमचमणारा ड्रेस उर्वशीला अधिकच दिमाखदार बनवत होता. हा गाऊन रॉयल ब्लू कलरचा आहे, ज्याची किंमत 5.5 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य- Instagram @urvashirautela)
या ड्रेससह अभिनेत्रीने ओशियानाचा 2 लाख रुपयांचा एक क्लच कॅरी केला होता. तिने या लुकसाठी साजेसा मेकअप केला होता. (फोटो सौजन्य: Instagram @urvashirautela)
उर्वशीचे या लुकसाठी मोकळ्या केसांची स्टाइल निवडली होती. तिच्या लुकमध्ये डायमंड इअर डँगलर्स आणि 2 लाखांचे ब्रेसलेट कॅरी केले होते. (फोटो सौजन्य- Instagram @urvashirautela)
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर उर्वशी अलीकडेच मिस युनिव्हर्स स्पर्धा 2021 जज करताना दिसली होते. तिने अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबत आंतरराष्ट्रीय गाण्याचाही प्रोजेक्ट केला आहे. (फोटो सौजन्य- Instagram @urvashirautela)
उर्वशी लवकरच जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश'मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री द्विभाषिक थ्रिलर "ब्लॅक रोज" तसेच "थिरुट्टू पायल 2" च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य-Instagram @urvashirautela)