बॉलिवूडमध्ये अनेक अशा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ज्यांनी अभिनयात तर आपली चमक दाखवलीच आहे. शिवाय त्या चित्रपटांची निर्मिती देखील करतात.
आलिया भट्टने आता स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आहे. सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती देत आपल्या निर्मितीगृहाचा फोटो शेअर केला आहे. 'इटरनल सनशाइन' असं त्याचं नाव आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
'बबली गर्ल'अनुष्का शर्मासुद्धा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Films) या नावाने स्वतःचं निर्मितीगृह सुरु केलं आहे. त्याबद्दल सांगताना अनुष्का म्हणते की, मला नवीन कलाकारांना दिग्दर्शकांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी द्यायची आहे. त्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
आपल्या अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केलेली अभिनेत्री कटरिना कैफसुद्धा एका निर्मितीगृहाची मालकीण आहे.
1994 ची फेमिना'मिस इंडिया 'आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सुद्धा ,'तंत्र एंटरटेनमेंट' या निर्मितीगृहाची मालकीण आहे. नुकताच 'आर्या' या वेबसीरिज मधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
'कहो ना प्यार' हे या चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री अमिषा पटेल हीसुद्धा एका निर्मितीसंस्थेची मालकीण आहे. तिने आपल्या प्रॉडक्शनखाली 'देशी मॅजिक' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
दीपिका पदुकोणसुद्धा स्वतःचं प्रॉडक्शन हाउस चालवते. मेघना गुलजारने दिग्दर्शन केलेला दीपिकाचा 'छपाक ' हा चित्रपट तिच्याच निर्मितीखाली तयार झाला आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
देसीगर्ल आणि आता आंतरराष्ट्रीय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणारी प्रियांका चोप्रासुद्धा स्वतःची निर्मितीसंस्था चालवते. 'पर्पल पेबल पिक्चर्स' असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव असून, त्यात तयार झालेल्या 'व्हेंटीलेटर' या मराठी चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. प्रियंका यात विविध भाषेतील उत्तम चित्रपट बनवण्याचा विचार करते. (फोटो - इंस्टाग्राम)
अभिनेत्री, लेखिका असणारी ट्विंकल खन्ना सुद्धा एका निर्मितीसंस्थेची मालकीण आहे. 'padman' हा चित्रपट तिच्याच निर्मितीसंस्थेत तयार झाला आहे.(फोटो - इंस्टाग्राम)