बॉलिवूड मधील सर्वात हॉट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत होय. मल्लिकाच्या या हॉट आणि बोल्ड फोटोंची आजही तितकीच चर्चा होते.
मल्लिका शेरावतला तिच्या अभिनयापेक्षा जास्त बोल्ड दृश्यांसाठी ओळखलं जातं.
मल्लिकाने मॉडलिंग पासून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. सुरुवातीला तिने काही जाहिरातींमध्ये काम केलं होतं.
मल्लिका शेरावतने 2002 मध्ये 'जिना सिर्फ मेरे लिये' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यामध्ये ती तुषार कपूर आणि करीना कपूरसोबत झळकली होती.
मात्र मल्लिकाला खरी ओळख मिळाली ती 'मर्डर' या चित्रपटामुळे. यामध्ये तिने इम्रान हाश्मीसोबत खुपचं बोल्ड सीन दिले होते.
मर्डर नंतर मल्लिकाला थेट हॉलिवूडच्या ऑफर्स येत होत्या. मर्डर नंतर मल्लिकाने जॅकी चॅनसोबत ' द मिथ' या चित्रपटात काम केल होतं.
या चित्रपटानंतर मल्लिकाला 'कान्स' महोत्सवाचं आमंत्रण देखील मिळालं होतं.
मल्लिकाने 'हिस्स' सारखा आगळावेगळा चित्रपट केला आहे.
या चित्रपटात मल्लिकाने काही न्यूड सीनसुद्धा दिले आहेत.
मल्लिका बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड पासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.