NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केलं नवं घर; किंमत ऐकून हैराण व्हाल

जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केलं नवं घर; किंमत ऐकून हैराण व्हाल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आता केवळ 23 वर्षांची आहे. काही वर्षांपूर्वीच तिचं फिल्मी करियर सुरू झालं असताना, तिने केलेल्या इतक्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

16

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने कलाविश्वात आल्यानंतर, काही दिवसांतच स्वत:चं नवं घर खरेदी केलं आहे. जान्हवीचं नवं घर जुहू भागात असून ते एका बिल्डिंगच्या तीन फ्लोअरवर आहे. (Photo Credit- @janhvikapoor/Instagram)

26

जान्हवी कपूरच्या या नव्या घराची किंमत ऐकून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, या घराची डिल तिने 39 कोटी रुपयांत केली आहे. जान्हवीने 7 डिसेंबर रोजी या नव्या घराची डिल फायनल केली होती. (Photo Credit- @janhvikapoor/Instagram)

36

जान्हवीने या घरासाठी 78 लाख रुपये स्टँम्प ड्यूटी भरली आहे. सध्या जान्हवी बहिण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्यासह लोखंडवालामध्ये राहते. (Photo Credit- @janhvikapoor/Instagram)

46

जान्हवीने 2018 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तिने गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या चित्रपटात भूमिका साकारली होती. लॉकडाउन काळात नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला होता. (Photo Credit- @janhvikapoor/Instagram)

56

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आता केवळ 23 वर्षांची आहे. काही वर्षांपूर्वीच तिचं फिल्मी करियर सुरू झालं असताना, तिने केलेल्या इतक्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. जान्हवी आगामी 'दोस्ताना 2' आणि 'रुही अफ्जाना' या दोन चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit- @janhvikapoor/Instagram)

66

जान्हवी सध्या बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत गोव्यात व्हॅकेशनवर असून, दोघांचा गोव्यातील फोटो व्हायरल होतो आहे.

  • FIRST PUBLISHED :