अभिनेत्री दिया मिर्झा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत असते. नुकताच तिच्या एका पोस्ट मुळे ती चर्चेत आली आहे.
अभिनेत्री दिया मिर्झाची ही पोस्ट कोरोना लसीकरणा संदर्भातील आहे. दियाने म्हटलं आहे, मला कोरोनाची लस घ्यायची आहे.
मात्र मला सध्या डॉक्टरांनी लसीकरण करण्यास नकार दिला आहे.
सध्या दिया मिर्झा प्रेग्नंट आहे. आणि त्यामुळेच डॉक्टरांनी तिला लसीकरणाची परवानगी दिलेली नाही.
दिया मिर्झाने हा प्रसंग चाहत्यांसोबत शेयर केला आहे.
त्याचबरोबर तिने पोस्ट करत फक्त प्रेग्नंट महिलांचं नव्हे तर, स्तनपान करणाऱ्या महिलांना सुद्धा सावध केलं आहे.
दिया मिर्झाच्या या जागरूकतेचं चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
दियाने काही महिन्यांपूर्वी उद्योगपती वैभव रेखी सोबत लग्न केलं आहे.