बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरु आहे. अनेक कलाकार एकापाठोपाठ एक लग्नबंधनात अडकत आहेत. आता अभिनेता हृतिक रोशनच्या दुसऱ्या लग्नाची माहिती समोर येत आहे.
सुजैन खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन सिंगल आयुष्य जगत होता. परंतु काही दिवसांपासून अभिनेत्याच्या अफेयर्सच्या चर्चा सुरु आहेत.
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद रिलेशनशिपमध्ये असल्याचं सतत म्हटलं जात आहे. यांनतर आता त्यांच्या लग्नाची चर्चा आहे.
दरम्यान हृतिक रोशनच्या एका जवळच्या मित्राने सबा आणि हृतिक रोशनच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
हृतिक आणि सबा एकमेकांना फारच पसंत करतात. शिवाय त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला फार आवडत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
इंडिया टुडेशी झालेल्या संवादात त्याने हा खुलासा केला आहे. परंतु त्याने आपलं नाव उघड न करण्याचं सांगितलं आहे.
या दोघांच्या जवळच्या मित्रानुसार सबा आणि हृतिक एकमेकांना पसंत करतात. अभिनेत्याच्या कुटुंबालादेखील सबा फारच पसंत पडली आहे.
पणतू त्या दोघांना अजून थोडा वेळ हवाय. लग्नाबद्दल तूर्तास त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीय असं त्याच्या मित्राचं म्हणणं आहे.