सलमान खानच्या 'जुडवा' या चित्रपटातील अभिनेत्री रंभा सर्वांनाचं लक्षात आहे.
रंभाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
रंभाने हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु , कन्नड अशा अनेक भाषांमध्ये काम केल आहे.
1990 ते 2000 या काळामध्ये रंभा खुपचं लोकप्रिय झाली होती.
रंभा सध्या चित्रपटांपासून दूर आहे.
मात्र ती 2008 मध्ये चर्चेत आली होती. कारण त्यावेळी ती बेशुद्ध झाली होती. आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सुरु झाली होती.
मात्र तिने शुद्धीत येत या गोष्टींना चुकीचं ठरवलं होतं. रंभाने श्रीलंकन व्यावसायिक इंद्रकुमार पथमनाथन सोबत लग्न केलं आहे.
रंभाला 2 मुली आणि 1 मुलगा आहे.
आज रंभा आपल्या कुटुंबांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.