बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री गेल्या काही महिन्यांत आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देत आई बनल्या आहेत.
यामध्ये आलिया भट्ट-सोनम कपूरपासून दिया मिर्झा-बिपाशा बसूचाही समावेश आहे.
बिपाशा बसूने चार महिन्यांपूर्वी गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे.
बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने आपल्या मुलीचं नाव देवी असं ठेवलं आहे.
मुलीच्या जन्मपासून बिपाशा बसूने नो फोटो पॉलिसी अवलंबली होती.
त्यामुळे देवीला पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक होते.
आता अखेर बिपाशा आणि करणने आपल्या लेकीचा चेहरा दाखवत सर्वांना तिची ओळख करुन दिली आहे.
देवीचे फोटो समोर येताच चाहते आणि सेलिब्रेटी भरभरुन कमेंट्स करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.