छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती रुबिना दिलैक सध्या आपल्या बहिणीच्या लगीनघाईत व्यग्र आहे.
रुबिनाची बहीण ज्योतीका दिलैक आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधत आहे.
तत्पूर्वी ज्योतीकाच्या हळदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
बहिणीच्या हळदी सोहळ्यात रुबिना अतिशय सुंदर दिसत आहे.
हळदी सोहळ्यातील ज्योतिकाचा पहाडी लूक सर्वांना आकर्षित करुन घेत आहे.
रुबिनाची बहीण एक ब्लॉगर आणि कन्टेन्ट क्रियेटर आहे.
ती गेल्या अनेक दिवसांपासून आपला कॉलेज मित्र आणि ब्लॉगर रजत शर्माला डेट करत आहे.
दरम्यान या दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.