'बिग बॉस ओटीटी' मधून लाइम लाईटमध्ये आलेली उर्फी जावेद तिच्या आउटफिट आणि ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अलीकडेच ती जुहूमध्ये एका ठिकाणी स्पॉट झाली होती. या दरम्यान, तिने पापाराझींना फोटो आणि व्हिडीओसाठी अनेक पोझ दिल्या. हे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्याबद्दल ती ट्रोलही होत आहे.(विरल भयानी)
या फोटोमध्ये उर्फी जावेदने जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. हा एक हाय स्लिट आणि बॅकलेस ड्रेस आहे. उर्फी जावेद या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. (फोटो- विरल भयानी)
उर्फी जावेदची हे फोटो आणि व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये आणि व्हिडीओमध्ये लोक तिच्या पोशाखाची खिल्ली उडवत आहेत.(फोटो- विरल भयानी)
एका युजरने तिच्या ड्रेसचं वर्णन दिवाळी ड्रेस म्हणून केल आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, "कसले कपडे बाजारात येऊ लागले आहेत."(फोटो - विरल भयानी)
उर्फीच्या ड्रेसवर कमेंट् करत एकाने लिहिलं आहे, 'वेडी आली'. तर आणखी एकाने लिहिलं आहे, 'हे तर कपडे कशासाठी घालते'. अशा कठोर शब्दात तिला ट्रोल केलं जात आहे. (फोटो -विरल भयानी)
दुसर्या युजरने लिहिल आहे, "मला वाटत बीबी ओटीटी पासून ही अधिक वेडी झाली आहे ... कोणीही असे वाईट आणि घाणेरडे कपडे परिधान करत नाही जसे ती घालते ..." (फोटो- विरल भयानी)
एका युजरने लिहिल आहे, "तुमचे कपडे काढल्याने तुम्ही नायिका बनत नाही. तर तुमची प्रतिभा दाखवा ... शरीर नाही. (फोटो - विरल भयानी)