सध्या बिग बॉस मराठी या शोची प्रचंड चर्चा आहे. या शोचा तिसरा सीजन सध्या सुरु आहे. आणि तो प्रचंड लोकप्रियदेखील होत आहे.
अशातच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनच्या कलाकारांनी एकत्र येऊन फुल्ल ऑन धम्माल केली आहे.
बिग बॉस मराठी सीजन १ च्या गर्ल्स ग्रुपचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये सीजन १ ची विजेती मेघा धाडे, सई लोकूर तसेच शर्मिष्ठा राऊत यांनी एकत्र येत हे रियुनिअन केलं आहे.
सई, मेघा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये या तिघीही आपल्या पतीसोबत दिसून येत आहेत. फोटोमध्ये तिघीही प्रचंड धम्माल करताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठीचा हा पहिला सीजनदेखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. या शोने या तिन्ही अभिनेत्रींना एक खास ओळख मिळवून दिली होती.