' बिग बॉस मराठी' फेम मीरा जग्गनाथ आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चांगलीच चर्चेत आली होती.
बिग बॉस मराठीमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता.
शो संपल्यानंतरसुद्धा ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मीराला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते फारच आतुर आहेत.
काही प्रमाणात चाहत्यांची ही ईच्छा पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.
मीरा कलर्स मराठीवरील 'लज्जत महाराष्ट्राची' या कुकिंग शोमध्ये दिसणार आहे.
यामध्ये ती आपलं कुकिंग टॅलेंट दाखवणार आहे.
हा एपिसोड आज दुपारी अडीच वाजता कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.