'बिग बॉस' हिंदीप्रमाणेच 'बिग बॉस' मराठीचीसुद्धा धडाकेबाज सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यात घरात विविध रंजक गोष्टी घडताना दिसून येत आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये सदस्यांमध्ये झालेल्या वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळाली. काल सदस्यांना गरबा नाईट्सचा आनंद घेता आला.
दरम्यान अपूर्वा आणि प्रसादमधील वाद काल विकोपाला गेला होता. संचालक असणारे हे दोघे टास्कदरम्यान एक मतावर येऊ शकले नाहीत. दोघेही आपल्या मुद्द्यावर अडून राहिल्याने साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य अनिर्णित ठेवण्यात आलं.
त्यानंतर घरामध्ये “चान्स पे डान्स” या उपकार्याला सुरुवात झाली आहे. किरण माने आणि निखिल राजेशिर्के या कार्याचे संचालक आहेत.
या टास्कमध्ये अक्षय केळकर आणि प्रसादने चक्क नऊवारी नेसत लावणीवर ठेका धरला होता. त्यांच्या सादरीकरणाने शोमध्ये प्रचंड धम्माल पाहायला मिळाली.
दरम्यान इतर सदस्य कोणकोणत्या गाण्यावर डान्स करतील हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आज विकास आणि यशश्री 'वो लडकी आख मारे' या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत.
तर बिग बॉसच्या घरात आज 'गरबा नाईट' देखील रंगणार आहे. यामध्ये सदस्य एकापेक्षा एक हटके गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. सर्वच सदस्य या गरबा नाईटमध्ये डान्सचा मनसोक्त आनंद लुटताना दिसणार आहेत.
घरामध्ये BB गरबा नाईटचा जल्लोष तर असेलच पण सदस्यांना एक खास सरप्राईझ देखील मिळणार आहे . हे सरप्राईज नेमकं काय असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आणि स्पर्धकही आतुर आहेत.