बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी - राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांनी हजेरी लावली होती.
त्यांच्या उपस्थितीत बिग बॉसने सदस्यांवर साप्ताहिक कार्य सोपवले होते. साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले आणि टीम ए त्याची विजेती ठरली.
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये समाजसेविका, गायिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या हजेरी लावणार आहेत.
आज घरामध्ये अमृता फडणवीस यांच्या साथीने सदस्य दिवाळी सण साजरा करणार आहेत. तत्पूर्वीच बिग बॉसने आज एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगलेच पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृता यांना काही प्रश्न देखील विचारले आहेत.
यशश्रीने विचारले देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? यावर उत्तर देत अमृता म्हणाल्या त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते.
किरण मानेनं विचारलं, तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असत, पण मला तुम्हांला विचारायचं आहे बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे ?
यावर उत्तर देत अमृता म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.