बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंग बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीत आली होती.
आरती सिंगचा एक वेडिंग फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये अभिनेत्रीने बिग बॉस फेम राजीव अदातियासोबत गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा होत आहे.
नुकतंच राजीव अदातियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे.
यामध्ये तो आरती सिंगसोबत वेडिंग लूकमध्ये दिसून येत आहे.
हा फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, राजीव आणि आरतीने लग्न केलेलं नाहीय.
तर या दोघांनी नुकतंच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.
राजीवने मजेत हा फोटो शेअर करत लग्न केल्याचं म्हटलं आहे. तर पुढे याच पोस्टमध्ये त्याने आपण फक्त थट्टा करत असून हे कॅलेंडरसाठी शूट केल्याचा खुलासा केला आहे.