बिग बॉस १४ मुळे लोकप्रिय झालेला गायक आणि अभिनेता राहुल वैद्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राहुल वैद्य आणि पत्नी अभिनेत्री दिशा परमारने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो दोघांच्या पहिल्या संक्रांतीचे आहेत.
राहुल आणि दिशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघेही काळ्या रंगाच्या ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसून येत आहेत.
यामध्ये दिशाने सुंदर अशी काठापदराची काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर राहुलने काळा कुर्ता आणि पायजमा घातला आहे.
इतकंच नव्हे तर दिशाने हलव्याचे दागिने आणि राहुलने हलव्याची माळ घातली आहे. या ट्रॅडिशनल लुकमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.
राहुल आणि दिशा परमारने काही महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे. या दोघांची जोडी फारच पसंत केली जाते.
राहुल वैद्यने बिग बॉसमध्ये आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तर बिग बॉसच्या घरात येऊन दिशानेसुद्धा आपला होकार कळवला होता.
शो संपल्यानंतर या दोघांनी लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.