रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन 14' मधून निकी तांबोळी घराघरात पोहोचली होती. या शोमुळे तिला तुफान लोकप्रियता मिळाली होती.
छोट्या पडद्यावर दिसण्यापूर्वी, निक्कीने अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सध्या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक गुड न्यूज शेअर केली आहे.
ही गुड न्यूज म्हणजे निक्कीने नुकतंच नवी कोरी 'मर्सिडीज बेन्ज' खरेदी केली आहे.
निकी तांबोळीने खरेदी केलेल्या कारची किंमत १.५ कोटी इतकी आहे.
निक्कीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती शोरूममध्ये सेलिब्रेट करताना दिसून येत आहे.
यावेळी निक्कीसोबत तिचे वडीलसुद्धा उपस्थित आहेत.
निक्की सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.