'बिग बॉस 16' सुरु होऊन आता दोन आठवडे उलटले आहेत. या दोन आठवड्यात घरात अनेक टास्क,राडे,प्रेम,मैत्री सर्वकाही पाहायला मिळालं आहे.
परंतु बिग बॉसच्या घरात अद्याप एव्हिक्शन झालेलं नव्हतं. दुसऱ्या आठवड्यामध्ये आता पहिलं एव्हिक्शन पाहायला मिळालं आहे.
बिग बॉस 16 च्या पहिल्याच एव्हिक्शनमध्ये 'उतरन' फेम अभिनेत्री श्रीजीता डे घराबाहेर गेली आहे.
श्रीजीता पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्याने तिचे चाहते निराश झाले आहेत.
या आठवड्यात घरातील 5 सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये शालिन भनौत, टीना दत्ता, एमसी स्टॅन, गोरी नागोरी आणि श्रीजीता डे यांचा समावेश होता.
यामध्ये सर्वात कमी मतं श्रीजीता डेला मिळाल्याने तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं आहे.
घरातील एका भांडणादरम्यान बिग बॉसच्या आदेशावरुन कॅप्टन गौतम वीजने या चौघांना नॉमिनेट केलं होतं.
तर बिग बॉस यांनी स्वतः शालिन भनौतचं नाव घेत त्याला नॉमिनेट केलं होतं.