दरवर्षीप्रमाणे 'बिग बॉस'चा यंदाचा सीजनसुद्धा प्रचंड चर्चेत आहे. सध्या बिग बॉसचा सोळावा सीजन सुरु आहे.
हा शो सध्या शेवटच्या टप्प्यावर असून येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६ चा फिनाले पार पडणार आहे.
यंदा टॉप ५ मध्ये प्रियांका चौधरी, शालिन भानौत, शिव ठाकरे , एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम यांनी आपलं स्थान बनवलं आहे.
या सीजनचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सर्वांनाच विजेत्याचं नाव जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान आता फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव आणि फोटो लीक झाल्याचं म्हटलं जात आहे.
अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी यंदाची विजेती ठरल्याची चर्चा होत आहे.
बिग बॉसची जुनी स्पर्धक अर्शी खानने प्रियांकाचा एक फोटो शेअर करत तिला विजेती म्हटलं आहे.
विशेष म्हणजे हातात बिग बॉसची ट्रॉफी दिसून येत आहे.
या व्हायरल फोटोमुळे प्रियांका विजेती बनली का? अशी चर्चा होत आहे. मात्र अधिकृत विजेत्यांच नाव १२ तारखेला उघड होईलच.