'बिग बॉस' हा असा रिऍलिटी शो आहे, ज्याद्वारे अनेक चेहऱ्यांचं नशीब बदललं आहे. याशोमुळे काहींना पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे तर काहींना आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे.
'बिग बॉस 16' च्या स्पर्धकांसोबतही असंच काहीसं घडत आहे. 'बिग बॉस' नंतर या टीव्ही सेलेब्सला चांगल्या ऑफर्स मिळत आहेत.
सुम्बुल तौकीर फिनाले वीकमध्ये पोहोचली नसली तरी तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
बिग बॉसनंतर आता अभिनेत्रीला मोठा प्रोजेक्ट मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कुंडली भाग्य'मध्ये सुम्बुल तौकीरची वर्णी लागल्याचं सांगितलं जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, मालिकेत मोठा लीप दाखविण्यात येणार आहे.
या लीपनंतर मालिकेत महत्वाची भूमिका साकारण्यासाठी सुम्बुल तौकीरची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे.
परंतु अद्याप सुम्बुल तौकीरकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीय.