शिव ठाकरे 'बिग बॉस १६' मध्ये सहभागी झाल्यापासून त्याच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत अनेक चर्चा होत आहेत.
यामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या नात्याचीदेखील तुफान चर्चा झाली. शिव आणि वीणाचा खरंच ब्रेकअप झालाय का? ते एकेमकांसोबत बोलतात का? असे अनेक प्रश्न चाहते उपस्थित करतात.
दरम्यान आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच शिव ठाकरेने वीणा आणि आपल्या नात्याबाबत मौन सोडत स्पष्ट उत्तर दिलं आहे.
नुकतंच ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेने वीणा आणि आपल्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी बोलताना शिव म्हणाला, बिग बॉस १६ असो किंवा मराठी बिग बॉस दोन्हीमध्ये बनलेली नाती माझ्यासाठी फारच खास आहेत.
कारण या दोन्हीं शोमध्ये मी जे काही केलंय ते अगदी मनापासून केलंय. आणि प्रेम विचार करुन होत नसत. त्यामुळे मला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप नाहीय.
वीणाशी अजूनही संपर्क आहे का? याबाबत बोलताना शिव म्हणाला, 'आम्ही रिलेशनशिपमध्ये नसलो तरी, बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी आम्ही संवाद साधला होता'. असं शिवने सांगितलं.
शिव ठाकरे आणि वीणा जगताप बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये एकत्र दिसले होते. या घराध्येच ते प्रेमात पडले होते.