NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss 16: मालिकांपूर्वी लोखंडवलातील मोबाईल दुकानात कामाला होता शालिन भनौत; स्पर्धकाबाबत 'या' गोष्टी तुम्हालाही करतील थक्क

Bigg Boss 16: मालिकांपूर्वी लोखंडवलातील मोबाईल दुकानात कामाला होता शालिन भनौत; स्पर्धकाबाबत 'या' गोष्टी तुम्हालाही करतील थक्क

Bigg Boss 16 Fame Shalin Bhanaut: 'बिग बॉस 16' च्या फिनालेमध्ये पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांपैकी शालिन भनौत एक आहे. त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

18

'बिग बॉस 16' च्या फिनालेमध्ये पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांपैकी शालिन भनौत एक आहे. त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

28

शोमध्ये येण्यापूर्वी शालीन बरीच वर्षे लाइमलाइटपासून दूर असला तरी ती सोशल मीडियावर सक्रिय होता. शोमध्ये गेल्यानंतर शालीनने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

38

परंतु खूप कमी लोकांना माहित आहे की, शालीनने करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड दिलं आहे.

48

शालीन भनौत हा मूळचा मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे. अभिनेता होण्यासाठी मुंबईत आल्यावर त्यांने उदरनिर्वाहासाठी मिळेल केलं होतं.

58

शालिन भनौत मुंबईतील लोखंडवाला येथे मोबाईलच्या दुकानात कामाला होता.

68

शालीन भनौतला दुकानात मालकाची प्रचंड बोलणीदेखील खावी लागत होती. त्याच्या वागण्यावरून दुकान मालक त्याला ओरडत असे. शालीन त्यावेळी नुकतंच इंग्रजी शिकत होता. दरम्यान एका ग्राहकाशी व्यवहार करताना त्याने चुकीचा प्रश्न विचारला होता.

78

याबाबत शालीन भनौत सांगितलं की, "मी 12वी पर्यंत मोठ्या मुश्किलीने शिकलोय. मी ग्रॅज्युएट झालो नाहीय. मला इंग्रजीही येत नव्हतं.

88

मुंबईतील लोखंडवाला येथील एका प्रसिद्ध मोबाईल शॉपमध्ये काम करत-करत मी इंग्रजी शिकलो."

  • FIRST PUBLISHED :