एजाजने त्यावेळी काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र पवित्रा या शोमधून बाहेर झाल्यानंतर एजाजनेही पवित्रासाठी आपलं प्रेम असल्याचं कबूल केलं होतं.
पवित्राने मीडियासमोर केक कट करत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यातील प्रेम सर्वांनाच दिसत होतं.
बिग बॉसमध्येदेखील या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली होती.
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर हे दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. सतत त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं जातं.
सोशल मीडियावरही या दोघांच्या फोटोंना अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.