छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादग्रस्त असलेल्या शो असलेल्या 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 13) आता नवं वादळं आलंय.
'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 13) होत असलेल्या वादात राखी सावंतने (Rakhi Sawant) उडी घेतली असून तिने बिग बॉसला चांगलंच सुनावलंय.
या शो मध्ये राखी सावंतचं नाव आल्याने राखी वैतागली असून तिनं आपला राग बीग बॉसवर काढलाय.
राखी म्हणाली, माझं लग्न झाल्यानंतरही लोक माझ्या मागे लागले आहेत. बिग बॉस तुम्ही तर माझे पहिले पती आहात. तुम्हाला मी आवडत होते.
बिग बॉस सीजन 1 मध्ये आपलं लग्न झालं होतं. असं असतानाही माझा अपमान होत असताना तुम्ही शांत कसे राहिलात.
सगळं जग मला ओळखत असताना बीग बॉसमध्ये माझी टिंगल केली जाते. मला बदनाम केलं जात असल्याचा आरोप तिने केलाय.
हे आरोप करताना ती सलमान खानवर चांगलीच भडकली आणि त्याला तिने दम देतच सुनावलंही.
एक टास्क पूर्ण करताना शहनाज गिल च्या ड्रामेबाजीला कंटाळून शेफाली जरीवालाने शहनाज ला 'पंजाब ची राखी सावंत' असं म्हटलं होतं. यावरून राखी सावंत भडकली असून सलमानने असं होऊच कसं दिलं असा सवाल तिने केलाय.
सलमान नेहमी माझं कौतुक करतो असं असताना आता माझी बदनामी तो सहनच कशी करू शकतो असंही तिने म्हटलंय. आपल्या Instagramवरून तिने 3 व्हिडीओ पोस्ट करून सलमानला सुनावलं आहे.
सलमानला सुनावताना तिने त्याला सलमान अंकल, सलमान अंकल असंही म्हटलंय. सलमानला अंकल म्हटलं म्हणून सलमानच्या चाहत्यांनी राखी सावंतला चांगलच धारेवर धरलंय.