बॉलिवूड ते छोटा पडदा सर्वच कलाकार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवला पसंती देत आहेत. आतापर्यंत जवळजवळ सर्वच कलाकारांनी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेतला आहे. यातच आता बिग बॉस 13 फेम आरती सिंगसुद्धा मालदीवला गेली आहे. मालदीव किनाऱ्यावरील हॉट फोटोंनी आरती चाहत्यांना घायाळ करत आहे.
इतर अभिनेत्रींसारखीच आरतीसुद्धा मालदीवच्या किनाऱ्यावर बिकिनीमध्ये हॉट अंदाजात दिसून आली
आरती सिंग छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिकांमधून काम केलं आहे.
आरतीला बोल्ड अंदाजात पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरती सिंग फारच कमी वेळा अशा हॉट अंदाजात दिसून येते.
फक्त बिकिनीच नव्हे तर मालदीवमध्ये आरतीनं टॉपलेस फोटोशूटसुद्धा केलं आहे.
आरती सिंगनं झी टीव्हीवरील 'मायका' या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली आहे.
आरती सिंग ही अभिनेता गोविंदाची भाची आहे. तर कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आहे.
आरती सिंग सध्या आपली आई आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टीना दत्तासोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.