भूमी आज बॉलिवूडमधील सर्वात टॉप अभिनेत्रींना टक्कर देते. तिची लाईफस्टाईल पण खूप लग्झरी आहे. 2015 मध्ये आयुष्यमान खुरानाची पहिली फिल्म दम लगा के हईशामधून भूमीला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली. त्या सिनेमात तिला लीड रोल करण्याची संधी मिळाली. टॉयलेट एक प्रेमकथा, शुभ मंगल सावधान, सोन चिडिया, पती पत्नी और वो, बाला, सांड की आंख, बधाई दो, रक्षाबंधन असे अनेक हिट सिनेमे तिने केले.
भूमी जेव्हा अॅक्टिंग स्कूलमध्ये शिकत होती तेव्हा तिला तिथून काढण्यात आलं. तिच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी लोन काढलं होतं. त्यामुळे तिने शिक्षणावर लक्ष्य द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. भूमीने लोन भरण्यासाठी शिक्षणासोबत कामही करायला सुरुवात केली. त्यामुळे शाळेत तिची उपस्थिती कमी झाली आणि स्कूलमधून तिला बेदखल करण्यात आलं.
बँकेचं लोन चुकवण्यासाठी भूमी सुरुवातीला यशराज फिल्म इथे असिस्टंट फिल्म डायरेक्टर म्हणून काम करत होती. तिथे मिळणाऱ्या पगारातून ती आपला खर्च काढत होती. त्यावेळी परिस्थिती कठीण होती मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भूमी आज एक सुपरहिट अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वास ओळखली जाते.
कधी को स्टार म्हणून तर कधी लीड रोल असं तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. भूमीने याआधी कास्टिंग डायरेक्टर म्हणून देखील काम केलं आहे. सुरुवातीच्या काळात शानो शर्मा यांच्यासोबत ती असिस्टंट म्हणून काम करत होती.
दम लगा के हईशा सिनेमा करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी शानो ऑडिशन घेत होते. त्यांनी भूमीला सांगितलं तू मॉक ऑडिशन द्यायला हवी. भूमीने यावर होकार दिला आणि आपली तयारी दाखवली. तिला सिनेमातील चार सीन करण्याची संधी मिळाली. तिने ते बखुबिने निभावले आणि सगळ्यांची मनं जिंकली. सिनेमाचे डायरेक्टर शरत कटारिया यांनी तिचं काम खूप आवडलं. त्यांनी सिनेमात कास्ट करायचं असं सांगितलं आणि तिथून खरी भूमीच्या करिअरला सुरुवात झाली.
शरत कटारिया यांच्या निर्णयानंतर शानो शर्मा यांनी थोडीची चिडूनच आपली प्रतिक्रिया दिली असं वाटल्याचं भूमीने सांगितलं होतं. यावर त्यांच्यात एकदा वादही झाला होता. त्याच रागातून त्यांनी यू आर फायर्ड असं म्हटलं होतं. भूमीलाही धक्का बसला होता. शर्मा यांनी भूमीला सांगितलं की तुझी हैशाच्या लीड रोलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे मला तुझं तोंडही पाहायचं नाही.