'कॉमेडी क्वीन' म्हणून भारती सिंगला ओळखलं जातं. भारतीने मनोरंजन सृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
भारतीचा मजेशीर स्वभाव आणि कॉमेडी टायमिंगचे कोट्यावधी चाहते आहेत.
परंतु भारती बऱ्याचवेळा आपल्या वजनामुळे ट्रोल होताना दिसून येते. आजही अनेकजण तिला बॉडीशेमिंग करताना दिसून येतात.
पिंकव्हीलाच्या रिपोर्ट्सनुसार, भारती सिंगने म्हटलं आहे की, तिला करिअरच्या सुरुवातीपासूनच जास्त वजनामुळे टोमणे ऐकावे लागले आहेत.
भारती पुढे सांगते, कित्येक लोकांनी तिला म्हैस, मोटी, गेंडा अशा नावांनी बोलावत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारती म्हणते मी आता स्वतः हे मान्य केलं आहे की, मी वजनदार आहे. पण काय करु हलवाईची लेक आहे. मिठाई खाऊन खाऊन अशी झालेय असंही भारतीने आपल्या मजेशीर अंदाजात सांगितलं.
तिने सांगितलं की, ज्यावेळी तिने हर्षसोबत लग्नाचा निर्णय घेतला, त्यावरुनही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. कारण अनेकांची मानसिकता अशी आहे की, जाड मुलीने जाड मुलासोबतच लग्न करायला हवं'.
कॉमेडियन भारतीने हर्ष लिंबाचियासोबत 2017 मध्ये लग्न केलं आहे. या दोघांना एक गोंडस मुलगादेखील आहे.