अनेकदा सेलिब्रेटींची स्टाइल फॉलो करणं सर्वसामांन्यांच्या खिशाला परवडणारं नसतं. पण कतरिना कैफची स्टाइल याला अपवाद ठरली आहे.
भारत सिनेमाच्या प्रमोशनवेळी कतरिनाने एक विशिष्ट स्टाइल फॉलो केली. यावेळी तिने फ्लोरल प्रिन्ट कपड्यांना प्राधान्य दिलं.
विशेष म्हणजे यातले अनेक लुक तिचे सोशल मीडियावर ट्रेण्ड झाले होते. येत्या ईदला सलमान आणि कतरिनाचा बहुप्रतिक्षित भारत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
महिन्याभरापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.
भारताच्या स्वातंत्र्यापासून सलमानची गोष्ट सुरू होते. सलमान सर्कसमध्ये ‘मौत का कुआ’त बाइक चालवताना दिसतो. दिशा पटानीही सर्कसमध्ये त्याच्यासोबत काम करताना दाखवण्यात आली आहे. यानंतर तो दुसरी नोकरी करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. इथे त्याची ओळख कतरिना कैफशी होते. इथे त्याला काम मिळतं. याचदरम्यान एक अशी घटना होते ज्यात सलमान भूतकाळात जातो.