'देवयानी' या मालिकेमुळे तुफान लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे होय. अभिनेत्री गेल्या बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे.
मात्र भाग्यश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत पोस्ट शेअर करत आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते.
नुकतंच भाग्यश्रीने एक दुःखद बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचं निधन झालं आहे.
वास्तविक भागयश्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू असल्याचं म्हटलं जात आहे.
अभिनेत्रीच्या बहिणीचा घातपात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी भाग्यश्रीच्या बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता.
त्यांनतर लगेचच भाग्यश्रीच्या बहिणीचा मृत्यू झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भाग्यश्रीच्या बहिणीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.