कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
या मालिकेतील राज आणि कावेरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
मालिकेत राज आणि कावेरी सर्व संकटांवर मात करत अखेर एकमेकांच्या जवळ येणार आहेत.
नुकतंच राज आणि कावेरीचा साखरपुडा पार पडला. लवकरच हा भाग मालिकेत दाखविला जाणार आहे.
या सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये राज आणि कावेरी पारंपरिक अंदाजात दिसून येत आहेत.
कावेरीने आपल्या साखरपुड्यासाठी सुंदर अशी काठपदराची हिरवीगार साडी नेसली आहे
तर दुसरीकडे राजनेसुद्धा खास असा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे.
राज आणि कावेरी या फोटोमध्ये रोमँटिक पोझ देताना दिसून येत आहेत.