'भाभीजी घरपर है' फेम अंगुरी भाभी म्हणेजच शुभांगी अत्रे सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
आपण पतीपासून विभक्त झाल्याचं सांगत शुभांगीने सर्वांनाच चकित केलं आहे.
कारण याआधी शुभांगी नेहमीच आपल्या अनोख्या लव्हस्टोरीबाबत मुलाखतींमध्ये संवाद साधत असे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभांगीने अवघ्या 19 व्या वर्षी पियुष पुरेसोबत लग्न केलं होतं.
शुभांगी आणि पियुष शाळेतूनच एकमेकांवर प्रेम करत होते. ते दोघेही एकत्रच शिकत होते.
या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. जी आता 18 वर्षांची झाली आहे. मुलगी दोन वर्षांची असताना शुभांगीने आपलं अभिनय करिअर सुरु केलं होतं.
जेव्हा शुभांगी शूटवर जायची तेव्हा पती मुलीचा सांभाळ करत असे. या दोघांमध्ये फारच छान बॉन्डिंग होतं. पीयूष मार्केटिंग क्षेत्रात काम करतो.
परंतु अचानक या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच चकित झाले आहेत.
शुभांगीच्या मते आपापसांत असणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.