तुम्हाला प्रसिद्ध टीव्ही शो 'भाभी जी घर पर हैं' चा 'गोरी मेम' आठवत असेल. त्यामध्ये तुम्ही गोरी मेम अर्थात 'अनिता भाभी जी'ला मालिकेत अनेकदा साडी नेसलेली पाहिली असेल. पण आता ती तिच्या बोल्ड अवतारात दिसत आहे. सौम्या टंडन आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. सौम्या टंडनने टीव्हीवरील भाभीजी मधील तिच्या ग्लॅमरस आणि हॉट अवताराने सर्वांना आश्चर्यचकित केले. तुम्हाला सांगू इच्छितो की सौम्या टंडन एका मुलाची आई आहे. तिचे फोटो आणि फिटनेस पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौम्या टंडनने 2016 मध्ये बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंगसोबत लग्न केले होते.
दोघेही कॉलेजमध्ये भेटले होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. सौम्या टंडनची खास गोष्ट म्हणजे ती प्रत्येक स्टाईलमध्ये खूप सुंदर दिसते.
या फोटोतही सौम्या टंडन ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
सौम्याने भाभीजी घरपर है मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
मालिकेतील तिची अनिता भाभी अर्थातच गोरी मेमची भूमिका चाहत्यांना भुरळ पाडत होती.
अनेक वर्ष या मालिकेत काम केल्यांनतर तिने मालिकेचा निरोप घेतला आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहे.
सौम्याने या आधी प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' अनेक वर्ष होस्ट केला आहे. यामध्ये बिग बॉस फेम जय भानुशाली त्याचा को होस्ट होता.
सौम्य टंडनने मालिका आणि रिएलिटी शोसोबतच चित्रपटातही काम केलं आहे. 'जब वुई मेट' चित्रपटात तिने करिना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.