छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी भाभीजी घर पर है ही मालिका आहे. या मालिकेचा चाहता वर्ग मोठा आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.
'भाभीजी घर पर है' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवची गुडन्यूज समोर आली आहे.
विदिशानं गुडन्यूज शेअर केल्यानंतर बोल्ड असं बेबी बंप फोटोशूट केलं आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये विदिशानं बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत.
विदिशा ही तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.
विदिशाचं बेबी बंप फोटोशूट नेटकऱ्यांना मात्र खूप आवडलेलं दिसत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.