बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत सध्या त्याचं लग्न, प्रेग्नेन्सी आणि यश दासगुप्ता या सर्व कारणानी चांगल्याच चर्चेत आहेत.
नुसरतचं नाव सध्या यश दासगुप्ताच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात ती आपल्या पतीपासून विभक्त असल्याने या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.
नुकताच नुसरत यांनी ट्वीट करून आपलं आंनी पती निखील जैनचं लग्न अवैध असल्याचं सांगितल आहे.
त्यामुळे यश दासगुप्ताचं नाव सातत्याने पुढे येत आहे.
यश दासगुप्ता हा एक अभिनेता, मॉडेल आणि राजकारणीसुद्धा आहे.
यश दासगुप्ताने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मात्र निवडणुकीत त्याला पराभव पत्करावा लागला होता.
यश आणि नुसरत काही दिवसांनपूर्वी सोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले होते.
नुसरत आणि यशने चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
तेव्हापासून ते दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचं बोललं जातंय.
यशने 'नं आना इस देस मेरी लाडो' या हिंदी मालिकेमधूनही प्रसिद्धी मिळवली होती.