जगप्रसिद्ध सौंदर्यवती लॉरा मोजिका रोमेरो (Laura Mojica Romero) हिला अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
श्रीमंत उद्योजकांच्या मुलांचं अपहरण करुन खंडणी वसूल करणाऱ्या एका टोळीचा मॅक्सिकन पोलिसांनी पर्दाफाश केला.
या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली.
या सात जणांची चौकशी केली असता लॉरा रोमेरो हे नाव समोर आलं.
त्यानंतर लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या गुन्हेगार टोळीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केली.
सध्या या सौंदर्यवतीची चौकशी सुरु आहे. जर तिच्याविरोधातील गुन्हा कोर्टात सुद्ध झाला तर तिला तब्बल ५० वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते.
लॉरा मोजिका रोमेरो ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे.
2018 साली मिस मॅक्सिको ही स्पर्धा जिंकून ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
सोशल मीडियावर देखील तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्याम माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्याम माध्यमातून ती कायम चर्चेत असते.